आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाही, पत्रकारांना मारहाण झाली, राहुल गांधींचा आरोप

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 24-08-2019
© IE Online Media Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेले

जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाहीय. शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरुनच माघारी पाठवून देण्यात आले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे आरोप केले.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळाबाहेर येण्यास परवानगी नाकारण्यात आली. श्रीनगर विमानतळावर उतरल्यानंतर तासाभरातच या शिष्टमंडळाला दिल्लीला माघारी पाठवून देण्यात आले. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती तिथे येऊन पाहण्याचे निमंत्रण दिले होते.

शिष्टमंडळाला काश्मीरमधल्या जनतेला नेमक्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय ते जाणून घ्यायचे होते. पण आम्हाला विमानतळाबाहेर येऊ दिले नाही. आमच्या बरोबर असलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नाहीय यावरुन स्पष्ट होते असे राहुल म्हणाले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्यांसह श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं आणि तिथूनच त्यांना परत पाठवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आलं.

अवश्य वाचा :

राहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरुनच पाठवलं परत

भारतीय अर्थव्यवस्था महासंकटात-राहुल गांधी

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon