आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

आता तू ‘नाईट वॉचमन’ व्हायला तयार रहा; सचिनचा रहाणेला सल्ला

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 08-10-2019
© IE Online Media Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेले

भारताने आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय मिळवला. मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही.

आक्रमक गोलंदाजी करत भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला.

हा सामना सुरू असतानाच भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला कन्यारत्नप्राप्ती झाली. त्याची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीकडे आणि मुलीकडे जाता आले नव्हते. पण हा सामना संपल्यानंतर रहाणे त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटला. त्याने सोशल मीडियावर पत्नी राधिका आणि मुलीबरोबरचा फोटो पोस्ट केला.

या फोटोनंतर साऱ्यांनी त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला दिलेल्या शुभेच्छा चांगल्याच चर्चेत राहिल्या. अजिंक्य आणि राधिका तुम्हा दोघांनाही शुभेच्छा!

  • क्रीडा क्षेत्रातले तारे

‘पहिल्या वेळी आई-वडिल होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या आनंदाचा पुरेपूर लाभ घ्या. महत्वाचे म्हणजे आता नाईट वॉचमन होऊन बाळाचे डायपर्स बदलायच्या जबाबदारीला तयार रहा’, असा सल्ला सचिनने अजिंक्यला दिला.

त्यावर अजिंक्यनेदेखील मजेदार उत्तर दिले. ‘धन्यवाद सचिन! लवकरच या संबंधी टिप्स घ्यायला मी तुला भेटणार आहे’, असे त्याने लिहिले.

दरम्यान, रहाणे त्याच्या मुलीला भेटल्यानंतर पुण्यात सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी पुन्हा भारतीय संघात सामील होणार आहे.

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon