आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

झहीरला शुभेच्छा देताना हार्दिक झाला ट्रोल

महाराष्ट्र टाइम्स लोगो महाराष्ट्र टाइम्स 08-10-2019
© Times Internet Limited द्वारे प्रदान केलेले

नवी दिल्ली:

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने सोमवारी आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान झहीर खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले. २०११ च्या विश्वचषक स्पर्धा विजेत्या संघाचा एक सदस्य असलेल्या झहीर खानला वाढदिवसाच्या निमित्ताने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने शुभेच्छा दिल्या. पण झहीर खानच्या चाहत्यांना मात्र हार्दिकचे शुभेच्छा देणे पसंत पडले नाही. ज्या प्रकारे हार्दिकने झहीर खानला शुभेच्छा दिल्या आहेत, ते पाहून चाहते अधिकच संतप्त झाले आहेत. यामुळे हार्दिक चांगलाच ट्रोल झाला आहे.

हार्दिक सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. पाठीच्या खालच्या बाजूस दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तो लंडनमधील रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. या दुखापतीतून सावरण्यासाठी हार्दिक पुढील चार ते पाच महिने क्रिकेटच्या मैदानाबाहेर असणार आहे. या दरम्यान त्याने झहीर खानचा एक व्हिडिओ पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनंदन करण्याच्या हार्दिकच्या या शैलीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

या व्हिडिओमध्ये झहीर खान हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दिसत आहे आणि हार्दिक झहीरच्या चेंडूवर षटकार ठोकताना दिसत आगे. १० सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विट करत हार्दिक झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत झहीरची गंमत करताना दिसत आहे.

हार्दिकने हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे जॅक... होम यू स्मॅश इट आऊट ऑफ द पार्क लाइक आय डीड हियर'. या सोबत त्याने हृदयाचे इमोजी आणि एक मोठ्याने हासणारी इमोजी, तसेच गंमतीची इमोजी पाठवली आहे.

१४ वर्षे टीम इंडियासाठी खेळणाऱ्या झहीर खानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीर खान एकूण ९२ कसोटी सामने, २०० वनडे आणि १७ टी-२० सामने खेळला आहे. कसोटी सामन्यात त्याच्या नावे ३२१ बळी, वनडेमध्ये २८२ बळी, तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १७ बळी मिळवल्याची नोंद आहे. अशा दिग्गज खेळाडूची हार्दिकने पंड्याने ज्या प्रकारे खिल्ली उडवली ते हार्दीकच्या चाहत्यांना जराही आवडले नाही. यामुळेच झहीरच्या चाहत्यांनी हार्दिकला सुनलायसाही मागेपुढे पाहिले नाही.

एका चाहत्याने हार्दिकचा टिकटॉकिए असा उल्लेख करत लिहिले, 'जब झॅकभाई अपने प्राइम पर थे, तब तेरे जैसे तो बॉल अपने से पहले स्टम्प पे बॅट मार लेते थे'

आणखी काही चाहत्यांच्या प्रतिक्रिया

© Times Internet Limited द्वारे प्रदान केलेले

More from Maharashtra Times

महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्र टाइम्स
image beaconimage beaconimage beacon