आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

संजय बांगर यांना वगळून विक्रम राठोड भारताचे फलंदाजी प्रशिक्षक

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 22-08-2019
© IE Online Media Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेले

बीसीसीआयच्या निवड समितीने गुरुवारी रात्री भारतीय संघाच्या सहायक प्रशिक्षकांच्या यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे. रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदावर पुन्हा एकदा नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनाही पुन्हा एकदा संधी मिळेल हे निश्चीत मानलं जात होतं. मात्र विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात, धोनीला फलंदाजीसाठी उशीरा पाठवण्याचा निर्णय घेणाऱ्या संजय बांगर यांना निवड समितीने संधी नाकारली आहे. त्यांच्या जागी विक्रम राठोड हे भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक असणार आहेत.

याव्यतिरीक्त गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनाही निवड समितीने पुन्हा एकदा संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, मात्र निवड समितीने पुन्हा एकदा श्रीधर यांच्यावरच विश्वास टाकला आहे.

असा असतील भारतीय संघाचे प्रशिक्षक –

मुख्य प्रशिक्षक – रवी शास्त्री

फलंदाजी प्रशिक्षक – विक्रम राठोड

गोलंदाजी प्रशिक्षक – भारत अरुण

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक – आर.श्रीधर

संघाचे माजी फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फरहात यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीन पटेल यांना त्यांच्या जागी संधी देण्यात आली आहे, तर गिरीश डोंगरे हे संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत.

अवश्य वाचा 

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon