आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

आदित्य ठाकरे ‘विफा’च्या उपाध्यक्षपदी

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 23-08-2019
© IE Online Media Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेले

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन या राज्य फुटबॉल संघटनेच्या नागपूर येथे शुक्रवारी झालेल्या ७०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गोंदिया जिल्ह्य़ाचे प्रफुल पटेल तसेच मुंबई जिल्ह्य़ाचे साऊटर वाझ यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि सचिवपदी फेरनिवड करण्यात आली.

मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि पालघर जिल्ह्य़ाचे पार्थ जिंदाल हे दोन नवे चेहरे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्याचबरोबर महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, हरेश व्होरा आणि विश्वजित कदम हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.

‘विफा’ची नवी कार्यकारिणी

अध्यक्ष : प्रफु ल्ल पटेल; उपाध्यक्ष : हरीश व्होरा, विश्वजीत कदम, मालोजी राजे, पार्थ जिंदाल, आदित्य ठाकरे; सचिव : साऊटर वाझ, कोषाध्यक्ष : प्यारेलाल चौधरी, सहसचिव : सुशील सुर्वे, सलीम परकोटे, किरण चौगुले; कार्यकारिणी सदस्य : इक्बाल काश्मीरी, अहमद लालानी, रवींद्र दरेकर, दीपक दीक्षित, अब्दुल रौफ, पी.व्ही. अहळे, योगेश परदेशी, साजिद अन्सारी, असगर पटेल, माणिक मंडलिक, गॉडविन डिक, सुलेमान जग्गू, आनंद कालोरकर.

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon