आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

भारत-बेल्जियम हॉकी मालिका : भारताकडून बेल्जियमचा धुव्वा

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 03-10-2019
© IE Online Media Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेले

अँटवर्प : भारतीय पुरुष हॉकी संघाने आक्रमक खेळाचे अप्रतिम प्रदर्शन करत जागतिक आणि युरोपियन विजेत्या बेल्जियमचा ५-१ असा धुव्वा उडवला. भारतीय हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यावर वर्चस्व गाजवत मालिकेतीह पाचही हॉकी सामने मोठय़ा फरकाने जिंकले.

गुरुवारी रंगलेल्या या दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताकडून सिमरनजीत सिंग (सातव्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (३५व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (३६व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंग (४२व्या मिनिटाला) आणि रमनदीप सिंग (४३व्या मिनिटाला) यांनी गोल लगावले.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने पहिल्या सामन्यात बेल्जियमला २-० असे हरवल्यानंतर स्पेनला पुढील दोन सामन्यांत ६-१ आणि ५-१ अशी धूळ चारली होती. त्यानंतर भारताने बेल्जियमविरुद्धचे पुढील दोन्ही सामने २-१ आणि आता ५-१ अशा फरकाने जिंकत आपले कर्तृत्व दाखवून दिले.

चारही सामने जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली रचत बेल्जियमच्या बचावपटूंवर दडपण आणले. त्याचाच फायदा उठवत सातव्या मिनिटाला सिमरनजीतने मैदानी गोल करत भारताचे खाते खोलले. बेल्जियमने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, पण पेनल्टी कॉर्नरवर त्यांचा प्रयत्न गोलरक्षक कृष्णन पाठकने हाणून पाडला. दुसऱ्या सत्रात बेल्जियमला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण पाठकने दोन्ही वेळा यशस्वी बचाव केला.

  • रिलेशनशिपच्या मैदानात क्रिकेटपटूंची यांच्याशी जमली जोडी

तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ललित कुमारने भारताला २-० असे आघाडीवर आणले. पुढच्याच मिनिटाला विवेक प्रसादने या स्पर्धेतील आपले खाते खोलले. पाठकची जागा पी. आर. श्रीजेशने घेतल्यानंतर ३८व्या मिनिटाला त्याने बेल्जियमचा प्रयत्न धुडकावून लावला, पण पुढच्या मिनिटाला अलेक्झांडर हेंड्रिक्सने बेल्जियमसाठी पहिला गोल नोंदवला. तिसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल नोंदवून सामन्यावर वर्चस्व गाजवले.

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon