आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

महेंद्रसिंह धोनी उतरला फुटबॉलच्या मैदानावर

महाराष्ट्र टाइम्स लोगो महाराष्ट्र टाइम्स 08-10-2019
© Times Internet Limited द्वारे प्रदान केलेले

मुंबई: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नुकताच फुटबॉलच्या मैदानावर उतरला होता. निमित्त होतं एका चॅरिटी सामन्याचं. टेनिस स्टार लिएंडर पेस यानं धोनीला साथ दिली. क्रिकेट आणि टेनिसमधील हे दिग्गज फुटबॉलच्या मैदानात काय पराक्रम गाजवतात हे पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींसह त्यांच्या चाहत्यांनीही गर्दी केली होती.

वाचा: 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी अभिनेता बनणार?

मुंबईत सोमवारी हा सामना पार पडला. धोनीच्या ब्रँडिंगचं काम पाहणाऱ्या 'हृति स्पोर्ट्स'नं या सामन्यातील काही क्षणचित्रे शेअर केली आहेत. यात धोनी आणि पेस फुटबॉलचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत काही अन्य क्रिकेटपटूही दिसत आहेत.

संबंधित Facebook पोस्ट

Facebook मधून सामायिक केलेले

इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. २०१४ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही खेळतो आहे. मात्र, वर्ल्डकपनंतर झालेला वेस्ट इंडिज दौरा व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याचा सहभाग नव्हता. बांगलादेशच्या विरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेतही धोनी नसेल. मात्र, डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यादरम्यान होणाऱ्या सामन्यात धोनीला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

© Times Internet Limited द्वारे प्रदान केलेले

More from Maharashtra Times

महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्र टाइम्स
image beaconimage beaconimage beacon